Recipe for Jumbo Chicken Popcorn
Ingredients
For Marination –
250 gms boneless chicken
1/2 tsp salt
1/2 tsp black pepper powder
1 cup buttermilk (150 gms)
for breading –
1 cup all purpose flour
1/2 tsp paprika powder
1 tsp red chili powder
1/2 tsp garlic powder
1/2 tsp oregano
1/2 tsp salt
1 tsp baking powder
oil for frying
Procedure:
-Cut boneless chicken into 1 to 1/2 inch pieces. Take it in a bowl
-Add black pepper powder, salt, and buttermilk in it. Cover it for 2 hours.
-After two hours; add black pepper powder, red chili powder, paprika powder, oregano, garlic powder, salt, and baking powder into all-purpose flour.
– Remove a piece of chicken from the mixture with tweezers & place on a side plate
-Gently coat the chicken pieces in the flour and place’em aside on a plate
-Lower the flame once oil reaches the required temperature
-Leave chicken pieces into the hot oil and fry until golden brown
Onion Salad Recipe
Ingredients:-
2 big onions
1 green chili (seeds extracted)
1/2 tsp red chili powder
salt as per taste
1/2 tsp chaat masala
pinch of black pepper powder
1/2 tsp lemon juice
chopped cilantro leaves
Procedure:-
-Cut onions into slices
-Remove seeds from green chili and then cut it
-Separate the round slices of onion into plates.
-Add red chili powder, salt as per taste, chaat masala, a pinch of black pepper powder, and chopped green chili. Add lemon juice then mix well.
-Add chopped cilantro leaves
जंबोचिकन पॉपकॉर्नची पाककृती
साहित्य
मॅरिनेशनसाठी –
२५० ग्रॅम बोनलेस चिकन
१/२ टीस्पून मीठ
१/२ टीस्पून काळी मिरी पावडर
१ कप बटर मिल्क (१५० ग्रॅम)
घोळण्याकरता पीठाचे मिश्रण
१ कप मैदा
१/२ टीस्पून पेपरिका पावडर
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून लसूण पावडर
१/२ टीस्पून ऑरगॅनो
१/२ टीस्पून मीठ
१ टीस्पून बेकिंग पावडर
तळण्यासाठी तेल
कृती :
-बोनलेस चिकन १ ते १/२ इंच तुकडे करावेत. ते बाऊलमध्ये घेऊन त्यात काळी मिरी पावडर, मीठ, बटर मिल्क घालून एकत्र करा. २ तासासाठी झाकून ठेवावे.
-नंतर दोन तासांनी, दुसऱ्या पसरट भांडयांत मैदा, काळी मिरी पावडर , लाल तिखट, पेपरिका पावडर, ऑरगॅनो, लसूण पावडर , मीठ, बेकिंग पावडर घालून सर्व एकत्र करावे.
-चिमट्याने मिश्रणातला चिकनचा तुकडा काढून बाजूच्या प्लेटमध्ये ठेवा.
-पिठामध्ये चिकनचे तुकडे हळूवारपणे घोळवून घ्या आणि बाजूच्या प्लेटमध्ये ठेवा.
– तेल तापल्यावर गॅस कमी करा. त्यात वरील चिकनचे तुकडे घालून गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्या.
कांद्याची कोशिंबीर
साहित्य
२ मोठे कांदे
१ हिरवी मिरची (बिया काढलेली)
१/२ टीस्पून लाल तिखट पावडर
चवीनुसार मीठ
१/२ टीस्पून चाट मसाला
चिमूटभर काळी मिरी पावडर
१/२ टीस्पून लिंबाचा रस
बारीक चिरलेली कोथींबीर
कृती :
-२ कांद्यांना त्याच्या गोल चकत्या येतील असा आडवा कापून घ्या.
-हिरवी मिरचीची बी काढून बारीक तुकडे करुन घ्या.
-प्लेट मध्ये कांदयाच्या गोल चकत्या वेगवेगळ्या करा. त्यात लाल तिखट, मीठ, चाट मसाला, मिरी पावडर, हिरवी मिरची घाला.
-लिंबू रस घालून हाताने एकत्र करा. बारीक चिरलेली कोथींबीर घाला.
#chickenpopcorn
#lachchaonionsalad
Jumbo Chicken Popcorn
Onion ring salad
source



0 Comments